Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळांच्या कंपन्यांची होणार चौकशी

भुजबळांच्या कंपन्यांची होणार चौकशी

=महाराष्ट्र सदन घोटाळा=
Chagan-Bhujbal2नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – राजधानी दिल्ली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडक पावलं उचलणार आहे, अशी माहिती ही बाब लावून धरणारे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित कंपन्या तातडीने सील केल्या जातील, असे आश्‍वासन मिळाल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. ईडी छगन भुजबळ, पंकज व समीर भुजबळ यांच्यावर कडक कारवाई करणार असून, त्यांची संपत्ती सील केली जाईल. याशिवाय १८२ कंपन्यांची चौकशी करून त्यातील बोगस कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशीही माहिती सोमय्या यांनी दिल्याचे यासंबंधीच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26242

Posted by on Dec 21 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (996 of 2451 articles)


=निर्भया बलात्कार प्रकरण= नवी दिल्ली, [२० डिसेंबर] - देशासह जगभरात गाजलेल्या राजधानी नवी दिल्ली येथील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या ...

×