richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » भूखंड घोटाळा: माजी मुख्यमंत्री हुड्डांवर एफआयआर नोंदवा!

भूखंड घोटाळा: माजी मुख्यमंत्री हुड्डांवर एफआयआर नोंदवा!

=सीबीआय चौकशीची शिफारस, अधिकारीही अडचणीत=
bhupinder-singh-hooda1चंडीगढ, [२० डिसेंबर] – हरियाणा सरकारने शनिवारी पंचकुला भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा समवेत ४ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर सरकारने या प्रकरणाची पुढील चौकशी सीबीआयद्वारे करविण्याची देखील शिफारस केल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ओएसडी जवाहर यादव यांनी दिली.
हुड्डा हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऍथॉरिटीचे अध्यक्ष असतानाच हा घोटाळा झाला होता. तसेच माजी आयएएस डीपीएस नवल आणि अथॉरिटीचे दोन अधिकारी एस.सी. कान्सल आणि बी.बी. तनेजा यांचीही चौकशी होणार आहे.
हरियाणात मागील काही वर्षांमध्ये अनेक भूखंड घोटाळे झाल्याची चर्चा आहे. यातील काही घोटाळ्यांमध्ये थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचेही नाव घेतले जाते. तसेच त्यांच्याविरोधात कारवाईची हरियाणा सरकार तयारी करीत असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी भाजपा सरकार राजकीय सुडातून कारवाई करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला.
घोटाळ्याची पार्श्‍वभूमी
पंचकुलाच्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपाशी संबंधित हा घोटाळा आहे. २०१२-१३ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. एकूण १४ भूखंडांबाबत वाद निर्माण झाला होता. या भूखंडांचा आकार ४९६ चौरस फूट ते १२८० चौरस फुटांपर्यंत होता. हुड्डा यांनी हे भूखंड आपल्या जवळच्या व्यक्तींंना तसेच नातेवाईकांना दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याचवर्षी मे महिन्यात भाजपा सरकारने या प्रकरणाची चौकशी राज्य दक्षता विभागाला सोपविली होती.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26248

Posted by on 2:06 pm. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google