Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

=आ. अंबरीश यांचा राजीनामा=
ambreeshबंगळुरू, [२० जून] – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी १४ मंत्र्यांना डच्चू देत आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर प्रदेश कॉंगे्रसमध्ये घमासान सुरू झाले आहे. चित्रपट अभिनेते आणि पक्षाचे आमदार अंबरीश यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे.
अंबरीश यांनी आपल्या स्वीय सचिवाच्या माध्यमातून एका ओळीचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष शिवशंकर रेड्डी यांच्याकडे पाठविला आहे. तथापि, स्वत: अंबरीश न आल्याने रेड्डी यांनी तो स्वीकृत केला नाही.
एखादा आमदार जेव्हा स्वत: राजीनामा पत्र सादर करतो, तेव्हा ते वैध मानले जाते. अन्य कुणाच्या हातून आलेला राजीनामा स्वीकारता येत नाही. त्यामुळे आम्ही अंबरीश यांचा राजीनामा परत पाठविला आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या मंत्र्यांना सरकारमधून डच्चू देण्यात आला, ते देखील सिद्धरामय्या आणि कॉंगे्रस श्रेष्ठींवर नाराज असून, पक्ष सोडण्याची धमकी त्यांनी दिली आहे. अनेकांनी आपली नाराजी प्रसारमाध्यमांपुढे उघडपणे व्यक्त केली आहे. त्यांच्या समर्थकांनी कर्नाटकच्या विविध भागांमध्ये निषेध आंदोलनही सुरू केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28675

Posted by on Jun 21 2016. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (207 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२० जून] - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपा नेते महेश गिरी यांच्यावर हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप ...

×