Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मल्यांची ६६३० कोटींची संपत्ती जप्त

मल्यांची ६६३० कोटींची संपत्ती जप्त

=ईडीची कारवाई=
Vijay Mallyaनवी दिल्ली, [३ सप्टेंबर] – सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये स्थायिक झालेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आज शनिवारी जोरदार दणका देत, त्यांची ६,६३० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीत मल्ल्या यांच्या मालकीचा बांधकाम अवस्थेत असलेला मॉल, बंगळुरू येथील ८०० कोटी रुपये किमतीचे आलिशान अपार्टमेंट, महाराष्ट्रातील २०० कोटींचे फार्म हाऊस, तसेच युनायटेड ब्रेअरिज आणि युनायटेड स्पिरीट्समधील तीन हजार कोटींच्या शेअर्सचा समावेश आहे. ईडीने २०१० मध्ये या मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण केले होते. आज या संपत्तीची किंमत ६,६३० कोटी रुपये इतकी झाली आहे. या कारवाईमुळे मल्ल्यांच्या एकूण ८०४१ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी मल्ल्यांची १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मल्ल्यांची मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी आहे. मल्ल्या न्यायालयीन सुनावणीसाठी हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत अनेक वॉरंट बजावण्यात आले आहेत. त्यांना विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29258

Posted by on Sep 4 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (104 of 2453 articles)


=फक्त २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा, ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव= नवी दिल्ली, [३ सप्टेंबर] - रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारत संचार ...

×