Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » महाराष्ट्राच्या दालनाचे आज उद्घाटन

महाराष्ट्राच्या दालनाचे आज उद्घाटन

=जागतिक व्यापार मेळा=
India-international-trade-fair-Delhi vyapar mela, pragati maidan, delhiनवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] – उद्या शनिवारपासून राजधानीतील प्रगती मैदानावर सुरु होणार्‍या जागतिक व्यापार मेळ्यात महाराष्ट्राचे दालनही राहाणार आहे. ‘मेक इन इंडिया’ ही यावर्षीच्या व्यापार मेळ्याची संकल्पना आहे.
१४ ते २७ नोव्हेंबर या काळात चालणार्‍या व्यापार मेळ्यात देशातील विविध राज्यांची आपल्या प्रगतीचे दर्शन घडवणारी दालने असतात.
‘मेक इन महाराष्ट्र’ या शीर्षकाखालील बॉलिवूडच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन उद्या शनिवारी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दुपारी ३.३० वाजता होणार आहे. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बांगडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक शिवाजी दौंड, निवासी आयुक्त आभा शुक्ल उपस्थित राहाणार आहेत. या दालनात महाराष्ट्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी राहाणार आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना मांडताना उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी, राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास, निर्यात, लघु उद्योगास प्रोत्साहन देणारे धोरण, विदेशी गुंतवणूक, स्मार्ट सिटी, पर्यटन आदी क्षेत्राचा परिचय करून दिला जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25416

Posted by on Nov 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (1251 of 2453 articles)


आज जागतिक मधुमेह दिन •भविष्यात भारत होणार मधुमेहींची राजधानी जगात १८० दशलक्ष रुग्ण देशात २०२५ पर्यंत तिप्पट संख्या नागपूर, ...

×