Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महिला आयोग अध्यक्ष, सचिवांची नियुक्ती होणार

महिला आयोग अध्यक्ष, सचिवांची नियुक्ती होणार

=मुख्यमंत्र्यांचे महिला आमदारांना आश्‍वासन=
devendra-fadnavis7नागपूर, [१० डिसेंबर] – राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. हायकोर्टाने हे पद भरण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे महिला आमदारांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी दोन्ही पद तात्काळ भरण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती कॉंग्रेसच्या आमदार माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्य महिला अत्याचारात वाढ झालेली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, शासकीय-निमशासकीय कार्यालयात वरिष्ठाकडून अत्याचार होत आहेत. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी समाजाची व पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य सचिव पद भरलेले नाही. या विभागाचा कारभार केवळ चारच लोकांवर सुरू आहे. त्यामुळे महिला अत्याचारांची प्रकरणे प्रलंबित असून महिलांना न्याय मिळण्यात दिरंगाई होत आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने अध्यक्ष व सदस्य सचिव पद ताबडतोब भरावे, असे निर्देश सरकारला दिले. पण या आदेशाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात सर्व महिला आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. विशेष असे की, हायकोर्टाच्या निर्देशानुसार हे पद भरण्याची उद्या १०डिसेंबर अंतिम मुदत आहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
अध्यक्ष आणि सचिवांचे रिक्त पद अधिवेशन संपण्यापूर्वी अथवा एक दोन दिवसांत भरण्यात येईल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासंदर्भात सरकारतर्फे पाऊले उचलली जातील.
प्रसंगी कठोर कायदा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी महिला आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26105

Posted by on Dec 11 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1041 of 2451 articles)


=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन= नागपूर, [१० डिसेंबर] - खादी व हस्तकलांच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कापड, बांबूपासूनच्या विविध ...

×