Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्ब

माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्ब

Bombs in wellबेळगाव, [९ मार्च] – संकेश्‍वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत हे बॉम्ब सापडल्यामुळे आश्‍चर्य आणि भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. काल सायंकाळी कामगारांना गाळ काढताना काही बॉम्ब आढळले. त्यांनी ही बातमी लगेच पाटील यांना दिली. पाटील यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी हे बॉम्ब ताब्यात घेतले आहेत.
हे बॉम्ब बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे गंजून गेले आहे. या बॉम्बची पाहणी मराठा लाई इन्फंट्रीचे अधिकारी करणार आहेत. त्यानंतरच हे बॉम्ब कोणते आणि कुठून आले याबाबत तपास सुरू करणार आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कोम्बिंग ऑपरेशन करताना अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर करण्यात येतो असे सांगण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27162

Posted by on Mar 10 2016. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (718 of 2452 articles)


नवी दिल्ली, [९ मार्च] - फेसबुकच्या लॉग इन सिस्टममध्ये ‘बग’ शोधून काढणार्‍या बंगळुरू येथील हॅकर आनंद प्रकाशला फेसबुक कंपनीने दहा ...

×