richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना प्रभावीपणे राबविणार

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना प्रभावीपणे राबविणार

=पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन=
PankajaMundeनागपूर, [९ डिसेंबर] – मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्याकरिता पहिल्या वर्षासाठी १५३.२३ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून, १८ वर्षांपर्यत ३१११.१८ कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये, ज्या मातेने एकुलत्या एक मुलीनंतर कुटुंब नियोजन केलेे आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये, मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी पाच वर्षांकरिता १० हजार रुपये, मुलीच्या सहावी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान, पोषण आहार व इतर खर्चासाठी ७ वर्षाकरिता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.
ज्या मातेला एक मुलगी असून दुसर्‍या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरिता २ हजार ५०० रुपये, दोन्ही मुली पाच वर्ष वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी पाच वर्षांसाठी १० हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता पाच वर्षांसाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता सहावी ते १२ वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरिता ७ वर्षांसाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र, एक मुलगी व एक मुलगा असलेल्यांना या योजनेचा मिळणार नाही.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणार्‍या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून, यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपयांचा विमा एलआयसीमध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपयाच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून, यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये विमाचा लाभ मिळणार आहे. पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी-आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासर्‍यांना पाच हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला पाच लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, असेही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26096

Posted by on 3:12 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google