Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला

=निवृत्तीवर पर्रीकर यांचे स्पष्टीकरण=
manohar-parrikar1नवी दिल्ली, [३० नोव्हेंबर] – निवृत्तीच्या मुद्यावर मी जे काही मत व्यक्त केले होते, त्याचा विपर्यास करण्यात आला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खमंग बातमी तयार करण्याच्या प्रयत्नात आपल्या सोयीनुसार अर्थ लावला. निवृत्तीबाबतचे माझे विधान फारच गंमतीचे होते, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.
वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर लोक आपल्या निवृत्तीबाबत विचार करायला सुरुवात करीत असतात. येत्या १३ डिसेंबरला मी देखील ६० वर्षांचा होणार आहे, असे मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते. पण, मीडियाने मात्र, ‘पर्रीकर यांनी निवृत्तीचे संकेत दिले’ अशा बातम्या प्रकाशित केल्या होत्या.
याविषयी आज सोमवारी अधिक सविस्तरपणे बोलताना पर्रीकर म्हणाले की, त्या कार्यक्रमात माझ्या वाढदिवसाचा विषय सुरू होता. आपल्या देशात ६० वर्ष हे निवृत्तीचे साधारण वय असते, पण मला याच वयात दिल्लीत पाठवून संरक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मी १३ डिसेंबरला साठी गाठणार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीच निवृत्तीबाबतचा विचार सुरू केला होता, मात्र ऐन वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर केंद्रात जबाबदारी सोपविली, असे मी बोललो होतो. त्यातून पत्रकारांनी आपल्या सोयीनुसार अर्थ काढला. माझ्या वक्तव्यातला विनोदही त्यांना कळला नाही, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25883

Posted by on Dec 1 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1110 of 2453 articles)


=निवृत्तीवर पर्रीकर यांचे स्पष्टीकरण= नवी दिल्ली, [३० नोव्हेंबर] - निवृत्तीच्या मुद्यावर मी जे काही मत व्यक्त केले होते, त्याचा विपर्यास ...

×