Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मार्क झुकेरबर्ग पितृत्व रजेवर जाणार !

मार्क झुकेरबर्ग पितृत्व रजेवर जाणार !

mark_zuckerbergनवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग हे दोन महिन्यांच्या पितृत्व रजेवर जाणार आहेत. त्यांची पत्नी गर्भवती असल्याने तिच्यासह होणार्‍या बाळाची काळजी घेण्यासाठी रजेवर जाणार असल्याचे फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी सांगितले आहे.
झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे की, मी आणि माझी पत्नी प्रिसिला आमच्या नव्या बाळाच्या आगमनाच्या तयारीत आहोत. ज्यावेळी आमच्या बाळाचे या जगात आगमन होईल त्यानंतर पुढे दोन महिने मी रजेवर जाणार आहे. नव्याने येणार्‍या बाळासोबत पहिल्या महिन्यात वेळ कसा खर्च करावा याचा आम्ही विचार करत आहोत. आम्ही आमच्या बालपणीचे आवडते खेळणे आणि पुस्तके जमवत आहोत.
प्रसूतीच्या कारणासाठी फेसबुकमधील अमेरिक न महिलांसह पुरूष कर्मचार्‍यांना आम्ही चार महिन्यांची वेतन रजा देतो. नोकरी करणार्‍या पालकांनी जर नवजात बालकांसोबत जास्तीत वेळ घालविला तर ते बालक आणि कुटुंबियासाठी लाभदायक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25623

Posted by on Nov 22 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1196 of 2458 articles)


=आठही आमदारांचा डीएएनमध्ये प्रवेश: राम माधव यांची माहिती= कोहिमा, [२१ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत नेस्तनाबूत झालेला ...

×