Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » माल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस

माल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस

Vijay Mallyaनवी दिल्ली, [३ मे] – भारतीय बँकांचे ९४०० कोटी रुपये बुुडवून परदेशात पळून गेलेले उद्योगपती विजय माल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यसभेच्या नितिमत्ता समितीने केली असल्याचे समजते.
राज्यसभेच्या नितिमत्ता समितीच्या आज झालेल्या बैठकीत विजय माल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे ही समिती आपली शिफारस करणार आहे. समितीची शिफारस मान्य झाली तर विजय माल्या यांचा राजीनामा फेटाळून लावत त्यांची राज्यसभेच्या सदस्यत्व पदावरुन हकालपट्टी होऊ शकते. या समितीची शिफारस मान्य झाली तर अशी कारवाई होणारे माल्या १५ वे सदस्य असतील. याआधी राज्यसभेने १४ जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
यासंदर्भातील माहिती समितीचे अध्यक्ष करणसिंह यांनी आज दिली. विशेष म्हणजे आपल्याला निष्कासित केले जाणार याची कुणकुण लागल्यानंतर विजय माल्या यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे पाठवला होता, त्याचप्रमाणे आपल्या राजीनाम्याची सूचनाही नितिमत्ता समितीला दिली होती.
मात्र नितिमत्ता समितीने विजय माल्या यांचा राजीनामा मान्य न करता त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्याचा कठोर निर्णय घेतला. करणसिंह यांच्या अध्यक्षतेखालील नितिमत्ता समितीने विजय माल्या यांच्यावर नोटिस बजावत समितीसमोर उपस्थित होण्याचे निर्देश दिले होते. मात्र या नोटिसकडे माल्या यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यावर करणसिंह यांनी विजय माल्या ७ दिवसात समितीसमोर उपस्थित झाले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र समितीसमोर उपस्थित होण्याचे टाळत विजय माल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28148

Posted by on May 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (384 of 2450 articles)


राज्य शासनाची फेरविचार याचिका स्वीकृत ५ मेच्या परीक्षेबाबत संभ्रम कायमच नवी दिल्ली, [२ मे] - वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या राष्ट्रीय ...

×