richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मुंबईत कॉंग्रेसची निदर्शनं, दिल्लीत तणाव

मुंबईत कॉंग्रेसची निदर्शनं, दिल्लीत तणाव

national-herald-case-protests-across-citiesनवी दिल्ली, [१९ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज दिल्ली, मुंबई मध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निर्देश दिलेले असतानाही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस मुख्यालयासमोर आज शनिवारी दुपारी शक्तिप्रदर्शन केले.
तर मुंबईत वांद्रे खेरवाडी येथेही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कॉंग्रेस नेते नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मुद्दाम या प्रकरणात अडकवलं जातयं, अशी टीका राणेंनी केली आहे. या आंदोलनात कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरूपम आणि माजी खासदार आणि आमदारही सहभागी आहेत. काही ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आंदोलकांकडून टायर ताब्यात घेतले आहेत. तर नवी दिल्ली येथे मुख्यालयासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून ते केंद्र सरकारविरोधात घोषणा देत आहेत.
दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीसाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सहाजण आज दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर राहणार आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26219

Posted by on 10:04 am. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google