Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबई रस्ते घोटाळा : १० लेखा परीक्षकांना अटक

मुंबई रस्ते घोटाळा : १० लेखा परीक्षकांना अटक

bmc_Brihanmumbai Mahanagar Palikaमुंबई, [१६ जून] – येथील रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिली मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात जबाबदार असणार्‍या दहा लेखा परीक्षकांना आझाद मैदान पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळता महापालिकेला सादर केल्याचा आरोप लेखा परीक्षकांवर करण्यात आला आहे. या अटकेनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून कंत्राटदारांचेसुद्धा धाबे दणालले आहे. आता यापुढची कारवाई पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील रस्ते बांधणीत ३५२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने मुंबईतील ३४ रस्त्यांची पाहणी करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख आपल्या अहवालात केल्याने पोलिसांनी ही अटक कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
करून दाखवलं म्हणणारेही जातील तुरुंगात : शेलार
या घटनेनंतर भाजपाने शिवसेनेला पुन्हा डिवचले असून आज केवळ अधिकारी आत गेले आहेत, यापुढे कंत्राटदार आणि त्यांच्या मागे ‘करून दाखवलं’, असे समर्थन करणारेही तुरुंगात जातील, असा टोला मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.
मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यासंदर्भात भाजपाने महापालिका आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी आवाज उठवल्यामुळेच आज ही पोलिस कारवाई झाल्याचे शेलार यांनी म्हंटले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28628

Posted by on Jun 17 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (223 of 2449 articles)


=चीनचा कांगावा= पेचिंग, [१६ जून] -एकीकडे भारत ‘एनएसजी’त प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चीनने ...

×