Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मुलायमसिंह पंतप्रधान, राहुल गांधी उपपंतप्रधान!

मुलायमसिंह पंतप्रधान, राहुल गांधी उपपंतप्रधान!

=कॉंगे्रससोबत युतीसाठी अखिलेश यांचा फार्म्युला=
17Fir02-03.qxpनवी दिल्ली, [४ डिसेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडी उभारून भाजपाचा विजयरथ रोखल्यामुळे देशभरातील राजकीय पक्षांमध्ये आगळाच उत्साह संचारला आहे. बिहारचा फार्म्युला विविध राज्यांसोबत २०१९ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांतही वापरण्याची रणनीती आतापासूनच तयार होऊ लागली आहे. याच अनुषंगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी कॉंगे्रसपुढे नवा फार्म्युला ठेवला आहे. सपा आणि कॉंगे्रसने देशपातळीवर युती करायची आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधान व कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उपपंतप्रधानपद द्यायचे, असा त्यांचा प्रस्ताव आहे.
नवी दिल्लीत आयोजित एका परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी आपली भूमिका विशद केली. यावेळी त्यांच्या शेजारीच राहुल गांधी हेदेखील बसले होते. तथापि, याहुल गांधी यांनी यावर कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.
आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रससोबत युती करू शकतो. पण, पंतप्रधानपद मुलायमसिंह यांच्याकडेच यायला हवे. राहुल गांधी हे आमचे जुने मित्र असले, तरी हा प्रस्ताव मान्य असेल, तरच आम्ही कॉंगे्रससोबत युती करू शकतो, असे स्पष्ट करताना या महाआघाडीत मायावती यांच्या बसपाचा समावेश करण्याची शक्यता अखिलेश यांनी फेटाळून लावली.
बिहारच्या धर्तीवर उत्तरप्रदेशातही आपण महाआघाडीचा विचार करीत आहात काय, असे विचारले असता, अखिलेश म्हणाले की, राज्यात आपल्या पक्षाने अतिशय चांगले काम केले असल्याने आम्हाला येथे महाआघाडीची गरजच नाही. राज्यात पुन्हा एकदा सपाचेच सरकार येणार आहे.
उत्तरप्रदेशातील दादरी येथे गोमांस खाण्यावरून एका मुस्लिमाला संतप्त जमावाने ठार केल्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता, कुणालाही काहीही खाण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे उत्तर त्यांनी दिले. राज्यातील जातीयतेच्या राजकारणाविषयी विचारले असता, अशा राजकारणाचा सपाला कधीच फायदा झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26006

Posted by on Dec 5 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1077 of 2453 articles)


हैद्राबाद, [४ डिसेंबर] - गेल्या चार दिवसांपासून चेन्नईत मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अख्खी चैन्नई पाण्याखाली गेली असून ...

×