Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मुशर्रफ भारतावर अणुहल्ला करणार होते

मुशर्रफ भारतावर अणुहल्ला करणार होते

=व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍याचा खळबळजनक दावा=
white-houseवॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – १९९९ साली कारगिल युद्धात भारतीय सैन्याकडून पाकचे सैनिक ठार झाल्याने, पराभव पत्करावा लागल्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारतावर अणुहल्ल्याची तयारी सुरू केली होती, असा खळबळजनक दावा व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने केला आहे.
सीआयए या अमेरिकन संरक्षण मुख्यालयाने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिटंन यांना तसा इशाराही दिला होता. सीआयएने दैनंदिन गोपनीय सूचनेचा भाग म्हणून ४ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी भेट निर्धारित असताना क्लिटंन यांना ही माहिती दिली होती, असा दावा व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍याने केला आहे. पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या दु:साहसामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली नाचक्की लक्षात घेता शरीफ अमेरिकेची मदत मागण्यासाठी बिल क्लिटंन यांच्याकडे गेले होते.
पाकिस्तान अण्वस्त्र तैनाती आणि त्यांच्या संभाव्य वापराची तयारी करत असल्याचे सीआयएने ४ जुलै १९९९ च्या आपल्या दैनंदिन गोपनीय अहवालामध्ये म्हटले होते, असे त्यावेळी व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत असलेले ब्रूस रीडेल यांनी सांगितले. क्लिटंन-शरीफ यांच्यात त्यावेळी झालेल्या भेटीच्या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये रीडेल यांचाही समावेश होता. सीआयएचे माजी तज्ज्ञ रीडेल यांनी सॅण्डी बर्जर यांच्यासाठी लिहिलेल्या श्रद्धांजली नोटमध्ये याचा खुलासा केला आहे. बर्जर यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. ते क्लिटंन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही होते.
तुम्ही शरीफ यांचे म्हणणे ऐकून घ्या, पण ठाम राहा, अशी विनंती बर्जर यांनी क्लिटंन यांना केली होती. या संकटाची सुरुवात पाकने केली आहे आणि कोणत्याही नुकसान भरपाईविना ते संपविले पाहिजे. पाकिस्तान परत फिरला तरच पुढे निर्माण होणारा तणाव टळू शकतो, हे क्लिटंन यांनी शरीफांना स्पष्टपणे सांगावे, असेही बर्जर यांचे मत होते. त्यानुसार शरीफ आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्यास राजी झाले. परंतु, त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. मुशर्रफ यांच्या नेतृत्वात पाक लष्कराने त्यांची सत्ता उलथवून टाकली आणि सौदी अरेबियात एक वर्ष विजनवासात घालवले. मात्र, यामुळे दक्षिण आशियात अणुयुद्धाचा धोका टळला, असेही रीडेल यांनी त्यामध्ये नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25956

Posted by on Dec 3 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1099 of 2458 articles)


चेन्नई, [३ डिसेंबर] - तामिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत पावसामुळे ...

×