Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी लवकरच येऊ

मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी लवकरच येऊ

=इसिसची भारताला धमकी, ठाण्याच्या तरुणाने जारी केला व्हिडीओ=
fahad-shaikh-kalyan1नवी दिल्ली, [२१ मे] – मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातून सीरियाला गेलेल्या आणि इसिस या जहाल दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या एका तरुणाने भारतावर सूड उगविणारा व्हिडीओ जारी केला आहे. बाबरीचा विध्वंस तसेच गुजरात, जम्मू-काश्मीर आणि मुझफ्फरनगरमधील दंगलीत मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आम्ही लवकरच हातात तलवारी घेऊन भारतात येणार आहोत, अशी धमकी या व्हिडीओतून देण्यात आली आहे.
नवाद तनवीर शेख असे या तरुणाचे नाव असून दोन वर्षांपूर्वी ठाणे व कल्याणमधील चार ते पाच तरुणांसह तो सीरियाला गेला होता. इसिससाठी इराकमध्ये लढताना यातील काही जण ठार झाले होते. तर, फवाद अजूनही इराकी फौजांविरुद्ध लढत आहे. त्याने अलीकडेच इसिसमधील काही वरिष्ठ नेत्यांसोबत हा व्हिडीओ तयार केला आहे. अरबी भाषेतील हा व्हिडीओ २२ मिनिटांचा आहे.
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला फवाद आता इसिसमध्ये अबु अम्र अल हिंदी या नावाने ओळखला जातो. या व्हिडीओतून त्याने भारतासोबतच काही दक्षिण आशियाई देशांना धमकी दिली आहे. यात त्याने लढ्यात ठार झालेला कल्याणमधील एक युवक शाहिम टंकी याला श्रद्धांजली वाहिली आहे. इराकच्या रक्का येथील बॉम्बहल्ल्यात टंकीचा मृत्यू झाला होता.
या व्हिडीओ तो म्हणतो की, ‘आम्ही लवकरच भारतात येत आहोत. आमच्या हातात तलवारी असतील. बाबरी मशिदीचा विध्वंस आणि जम्मू-काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमधील दंगलींमध्ये मुस्लिमांच्या झालेल्या हत्येचा बदला घेणार आहोत. भारतात आम्ही स्थानिक जिहादींकडूनच हल्ले घडवून आणणार आहोत.’ या व्हिडीओत फवादसह आणखी काही दहशतवाद्यांनीही संदेश दिले आहेत. इसिसने भारताला अशाप्रकारे थेट धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इसिसच्या विचारसरणीचा भारतात फार कमी प्रभाव असला, तरी सुरक्षा यंत्रणांनी गाफिल राहू नये, असे केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28390

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (297 of 2450 articles)


=राजद, जदयुमध्ये घमासान= पाटणा, [२१ मे] - बिहारमधील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद या सत्तारूढ आघाडीतील सहकारी ...

×