Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मुस्लिमांना अमेरिका प्रवेशबंदीवर ट्रम्प ठाम

मुस्लिमांना अमेरिका प्रवेशबंदीवर ट्रम्प ठाम

=अवैध स्थलांतरितांनाही देशाबाहेर हाकलणार=
donald_trumpवॉशिंग्टन, [५ मे] – अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्याची अधिकृत घोषणाच होणे बाकी असलेले डोनाल्ड ट्रम्प मुस्लिमांना अमेरिकत प्रवेश न देण्याच्या आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असून, अवैध निर्वासितांना देशाबाहेर काढणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
सीएनएन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले की, विदेशी मुस्लिमांना अमेरिकेत तात्पुरती प्रवेशबंदी करण्याच्या प्रस्तावावर आपण ठाम आहे. मात्र, असे असले तरी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मुस्लिम देशांसोबत काम करणार आहे. परंतु, याची जबाबदारी संबंधित देशांवर असेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
सध्या जगाच्या अनेक भागांमध्ये जे काही घडत आहे त्यापासून आम्ही सावध राहिले पाहिजे. आज हजारो लोक आमच्या देशात येत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात हे लोक पसरले असून, ते नेमके कोण आहेत, हे कोणालाच माहीत नाही. असंख्य लोकांकडे वैध दस्तावेज नाहीत आणि याबाबत आम्ही काहीच करत नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिटंन यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आधीच प्रखर टीका केली आहे. हिलरी क्लिटंन अध्यक्ष झाल्यास असे विभाजनकारी राजकारण कदापि सहन करणार नाही, असे हिलरी गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जॉन कॅसिच यांचीही माघार
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्यात शेवटचा अडथळा असलेले प्रतिस्पर्धी व ओहियो प्रांताचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांनीही व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे न्यूयॉर्क येथील रियल इस्टेट क्षेत्रातील मातब्बर अब्जाधीश ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॅसिच यांना ओहियो वगळता इतर कुठेही विजय मिळवता आला नाही. कॅसिच यांनी माघार घेण्याच्या काही तास अगोदर टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ यांनीही अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28188

Posted by on May 6 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (372 of 2455 articles)


नवी दिल्ली, [५ मे] - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरसह ...

×