richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » मोदींचा रशिया दौरा; कुडानकुलम् कराराची शक्यता

मोदींचा रशिया दौरा; कुडानकुलम् कराराची शक्यता

India's PM Modi reacts during a meeting with Brazil's President Rousseff on the sidelines of the 6th BRICS summit at the Alvorada Palace in Brasiliaनवी दिल्ली, [२० डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारपासून रशियाच्या दौर्‍यावर जाणार असून, त्यांच्या या दौर्‍यात अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढविण्यासह कुडानकुलम् अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी करार होण्याची दाट शक्यता आहे.
देशाची ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेता अणुऊर्जा प्रकल्प उभारणे शक्य आहे अशा देशातील विविध ठिकाणांचा उपयोग करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सूत्राने याबाबत बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी २३ आणि २४ डिसेंबर रोजी रशियाच्या दौर्‍यावर जाणार असून, मॉस्को येथे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यासह भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या रशिया दौर्‍यापूर्वी रशियाच्या रोसॅटॉम या संस्थेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलाय स्पास्कीय यांनी ७ व ८ डिसेंबर रोजी भारताला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी अणुऊर्जा विभागाचे सचिव शेखर बसू यांच्यासोबत कुडानकुलम् प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासंबंधी चर्चा केल्याचे समजते. त्या पार्श्‍वभूमीवर भारत-रशिया यांच्यात हा करार होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26257

Posted by on 2:17 pm. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google