richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मोदींच्या ‘सुवर्ण’ योजनेला सिद्धीविनायक मंदिराचा प्रतिसाद

मोदींच्या ‘सुवर्ण’ योजनेला सिद्धीविनायक मंदिराचा प्रतिसाद

Siddhivinayak-Temple-Mumbai1मुंबई, [९ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अतिमहत्वाकांक्षी सुवर्ण मुद्रिकरण योजनेला सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने प्रतिसाद दिला असून, आपल्याकडील ४० किलो सोने या योजनेमध्ये गुंतविण्याचे निश्‍चित केले आहे. यातून सिद्धिविनायक ट्रस्टला वर्षाकाठी ६९ लाख रूपये व्याज मिळणार आहे.
देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टने मोदींच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये ४० किलो सोने गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे देशातील इतर मोठे देवस्थानही या योजनेमध्ये गुंतवणुक करण्यासाठी पुढे येतील. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिराकडे दान स्वरूपात जमा झालेले सोन्याच्या दागिन्यांचा या ४० किलोमध्ये समावेश आहे. हे सोने वितळवून शुद्ध स्वरूपात सरकारच्या योजनेमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. वितळल्यानंतर हे सोनं किमान ३० किलो होईल. त्याची बाजारभावाने किंमत साडे सात कोटी असेल. या सोन्यावर २ ते २.५ टक्के या व्याजदरानुसार ट्रस्टला सरकारकडून दरवर्षी ६९ लाख रूपये व्याज मिळणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून सुवर्ण मुद्रिकरण योजनेला देशात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत केवळ ४०० ग्रॅम सोनेच गुंतविण्यात आले होते. आता मात्र सिद्धिविनायक ट्रस्टने एवढया मोठया प्रमाणात सोने गुंतवल्यामुळे भविष्यात आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता केली जात आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26084

Posted by on 2:53 pm. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google