Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींना हटविल्याशिवाय पाकशी चर्चा अशक्य

मोदींना हटविल्याशिवाय पाकशी चर्चा अशक्य

=मणिशंकर अय्यरांची मुक्ताफळे=
mani_shankar_aiyar1नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] – केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या कॉंगे्रसी नेत्यांमध्ये आता मणिशंकर अय्यर यांचीही भर पडली आहे. पाकिस्तानच्या ‘दुनिया’ टीव्हीशी बोलताना, त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविल्याशिवाय पाकिस्तानशी शांतता चर्चा होणे शक्य नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे देशात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता बळावली तर आहेच, शिवाय पाकिस्तानला खुश करण्यासाठी कॉंगे्रसमध्ये जोरदार चढाओढ सुरू असल्याचेही हे प्रतीकच आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत होण्यात सर्वांत मोठा अडथळा म्हणजे स्वत: पंतप्रधान मोदी हेच आहेत. दोन्ही देशांमधील कटुता संपविण्यासाठी सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटविणे आवश्यक आहे, अशी गरळ त्यांनी पाकच्या ‘दुनिया’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ओकली.
भारत-पाक संबंध सुरळीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. भारत-पाक चर्चा होणे शक्य आहे. पण, मोदी त्यात आडकाठी आणत आहेत. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदावरून हटविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांनीही भारत-पाक संबंधात नरेंद्र मोदीच सर्वांत मोठा अडथळा असल्याची बडबड पाकमधील एका कार्यक्रमात केली होती. पाकने मैत्रीचा हात पुढे केला, पण भारतातील भाजपा सरकारने तो स्वीकारला नाही, असे खुर्शीद म्हणाले होते.
अय्यर यांची मुलाखत घेणारा पत्रकार मोईन पिरजादा याने त्यांना, मोदी यांना पदावरून हटविण्यासाठी तुम्ही इसिसला सुपारी देत आहात काय, असा प्रश्‍न आवर्जून विचारला. त्यावर अय्यर म्हणाले की, ‘तसे नाही, त्यासाठी आपल्याला चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, भारतातील लोकांना मोदी यांच्यापासून बर्‍याच अपेक्षा आहेत. पण, त्या पूर्ण होतील, याची शाश्‍वती मला नाही. तसेच, मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारत-पाक संबंध सुधारण्याची शक्यताही फार कमी आहे.’
विशेष म्हणजे, याच टीव्ही वाहिनीने पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांचीही मुलाखत प्रसारित केली होती. अनेक देशांमध्ये हिंसक कारवाया करीत असलेल्या दहशतवाद्यांची निर्मिती पाकनेच केली आहे आणि जम्मू-काश्मिरातही पाकनेच अतिरेकी पाठविले आहेत. ओसाबा बिन लादेन आणि अल् जवाहिरी हे आमचे हिरो असल्याचेही मुशर्रफ यांनी मान्य केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25523

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1220 of 2453 articles)


=‘जी-२०’ समूहातील काही देशांचाही समावेश : पुतीन यांचा गौप्यस्फोट= अंटालिया, [१७ नोव्हेंबर] - पॅरिस हल्ल्यानंतर संपूर्ण जग इसिसविरोधात एकत्र आले ...

×