Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

=शांघाय समूहाची आजपासून बैठक=
Modi-Jinpingबीजिंग, [२२ जून] – शांघाय को-ऑपरेशन ऑर्गानायझेशनची (एससीओ) बैठक उद्या गुरुवारपासून उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरू होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी उद्या गुरुवारी ताश्कंदला जाणार असून, त्याठिकाणी जिनपिंग यांची ते भेट घेणार आहेत.
अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी पंतप्रधान मोदी या बैठकीत जिनपिंग यांच्याशी चर्चा करून चीनचा पाठिंबा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत. एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाला चीनचा विरोध असून, भारतासोबतच पाकिस्तानलाही या गटाचे सदस्यत्व मिळावे, अशी भूमिकाही चीनने घेतली आहे.
दरम्यान, भारताचा मार्ग चीनने रोखला आहे, हा आरोप या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्त्या हु च्युनिंग यांनी फेटाळून लावला. आमच्यावर चुकीचा आरोप केला जात आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारात सहभागी नसलेल्या देशांना एनएसजीमध्ये आजवर कधीच प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे भारताच्या उमेदवारीचा मुद्दा एनएसजीच्या बैठकीत चर्चेत येण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28730

Posted by on Jun 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (197 of 2458 articles)


=मुक्काम मात्र कारागृहातच= मुंबई, [२२ जून] - महाराष्ट्र सदन नूतनीकरणासह विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील घोटाळ्यांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी ...

×