Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी राम मंदिर नक्की उभारतील

मोदी राम मंदिर नक्की उभारतील

=प्रवीण तोगडिया यांचा विश्‍वास=
PRAVEEN_TOGADIAभोपाळ, [७ डिसेंबर] – अयोध्या ही भगवान श्रीरामचंद्राचीच जन्मभूमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अयोध्येत भव्य राममंदिर उभारेल, असा विश्‍वास विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज सोमवारी येथे व्यक्त केला.
भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तोगडिया बोलत होते. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचा वादग्रस्त भाग उद्‌ध्वस्त करण्यात आला होता. त्याच ठिकाणी भव्य राम मंदिर उभे राहील, यावर मला विश्‍वास आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केलेल्या ठरावानुसार आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिलेल्या आश्‍वासनानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभारून कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी सरकार नक्कीच प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर उभारले. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर करण्यात येईल, असे आश्‍वासन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आल्याची आठवण तोगडिया यांनी यावेळी करून दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26034

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1068 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ डिसेंबर] - प्रख्यात कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांना आज सोमवारी सकाळी अर्धांगवायूचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीने ...

×