Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारने काम करून दाखविले : हेपतुल्ला

मोदी सरकारने काम करून दाखविले : हेपतुल्ला

najma_heptullah1नवी दिल्ली, [२४ मे] – मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त केंद्रीय अल्पसंख्यक विकास मंत्री डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी मंगळवारी आपल्या मंत्रालयाअंतर्गत झालेल्या कामांचा अहवाल सादर केला. मोदी सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ हा केवळ नाराच दिला नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखविले आहे, असे त्यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
डॉ. हेपतुल्ला पुढे म्हणाल्या, आमच्या खात्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यावेळी कोचिंगच्या माध्यमातून पाच मुलांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच मुलींना शिष्यवृत्ती, अभ्यासवृत्ती देण्यात आली एवढेच नव्हे तर कौशल्य विकास अभियान राबविण्यात आले.
मागील सरकारने मदरशांविषयी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, फारसे काम केले नाही. आम्ही मात्र मदरशात कौशल्य विकास अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. या अभियानासाठी जागतिक बँकेने पाच कोटी डॉलर्स एवढे कर्ज दिले आहे. याबाबतीत भारताने जो आराखडा तयार केला त्याचेच अनुकरण अन्य देशांनीही केले, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी विरोधकांनी भीतीचे वातावरण निर्माण केले. अल्पसंख्यक मंत्रालयच संपुष्टात येणार, अशा अफवा पसरवायला सुरुवात केली. मंत्रालयाचे बजेट (अर्थसंकल्प) कमी होईल, असाही अपप्रचारही विरोधकांनी केला. मात्र, आमचे बजेट वाढतच आहे, याकडे डॉ. हेपतुल्ला यांनी लक्ष वेधले. कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. वक्फ बोर्डाची एकूण संपत्ती सहा लाख रुपये एवढी आहे. जर ही संपत्ती आम्ही घेतली तर अल्पसंख्यकांच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना आखण्यात येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही योग्य मार्गावर
आम्ही योग्य मार्गावर जात आहोत, असेही डॉ. नजमा हेपतुल्ला यांनी ठामपणे सांगितले. आमच्या मंत्रालयाची यशगाथा २८ मे रोजी विज्ञान भवनात दाखविण्यात येईल. आमच्या योजनांच्या माध्यमातून ३२ मदरशातील २४ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28485

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (269 of 2450 articles)


नवी दिल्ली, [२४ मे] - राजधानी दिल्लीतील वीज कपात आणि पाण्याचा तुटवडा या मुद्यांवरून केजरीवाल सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात ...

×