Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारने विश्‍वास सार्थ ठरविला

मोदी सरकारने विश्‍वास सार्थ ठरविला

=लालकृष्ण अडवाणी यांचे प्रतिपादन=
advani_l_kहरिद्वार, [२२ मे] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला याच आठवड्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. देशवासीयांनी ज्या अपेक्षा आणि विश्‍वासाने नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची सूत्रे सोपविली होती, तो विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच सार्थ ठरविला आहे. अपेक्षेपेक्षाही अतिशय चांगले काम या सरकारने केले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी आज रविवारी केले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर देशातील नागरिकांनी जो विश्‍वास दाखविला होता. तो विश्‍वास या सरकारने प्रत्यक्ष खरा करून दाखविला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडेच सरकार कार्य करीत आहे. सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला आहे. सरकारची नीती आणि धोरणे खरोखरच प्रशंसनीय आहेत, असे अडवाणी यांनी ऋषीकेशकडे जाताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशवासीयांना मोदी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यातील बहुतांश अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या आहे. मला सांगताना खरोखरच आनंद होत आहे की, सरकारने दोन वर्षांच्या काळात जे काही निर्णय घेतले, ते योग्य होते आणि अपेेक्षेपेक्षाही सरस कामगिरी होती, असे अडवाणी म्हणाले.
येत्या २६ मे रोजी मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गुजरात भाजपाने अहमदाबादेत ‘विकास पर्व’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, स्वत: लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28417

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (291 of 2450 articles)


नवी दिल्ली, [२२ मे] - निवडणुका म्हटल्या की अपक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि अनेकदा त्यांच्याच हातात सत्तेची किल्ली ...

×