Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मौर्य भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

मौर्य भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

=ओमप्रकाश माथूर यांची घेतली भेट=
swami-prasad-mauryaनवी दिल्ली, [२५ जून] – उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे राजकारण आतापासूनच तापायला लागले आहे. बसपाला रामराम ठोकल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी शुक्रवारी रात्री भाजपाचे उत्तरप्रदेशातील प्रभारी ओम माथूर यांची भेट घेतली. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बसपा नेत्या मायावती यांनी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांचा लिलाव मांडला आहे, असा आरोप करून मौर्य यांनी बसपाचा राजीनामा दिला होता. आपण लवकरच दिल्लीला जाऊन आपली पुढील व्यूहरचना ठरविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, शुक्रवारी त्यांनी माथूर यांची भेट घेतली. तथापि, त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
दरम्यान, उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांच्या मते, स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडून अद्याप भाजपात येण्याचा कोणताही प्रस्ताव आला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर निश्‍चितच विचार करू. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मौर्य यांची स्तुती करताना, ते अतिशय चांगले नेते आहेत. पण, बसपासारख्या चुकीच्या पक्षात असल्याने त्यांना सन्मान मिळत नव्हता, असे वक्तव्य केले होते.
मौर्य स्वार्थी, गद्दार नेते : मायावती
लखनौ – बसपाचा राजीनामा देणारे स्वामीप्रसाद मौर्य यांच्यावर पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज शनिवारी जोरदार हल्ला चढविला. मौर्य हे स्वार्थी आणि गद्दार नेते आहे. स्वत:च्याच समाजाचे हित दुर्लक्षित करून त्यांनी केवळ स्वार्थ साधला, असा आरोप मायावती यांनी केला.
मौर्य स्वत:हून पक्षाबाहेर गेले, हे फार चांगले झाले. त्यांना आयुष्यात आता कधीच बसपात प्रवेश मिळणार नाही. पक्ष आणि स्वत:च्या समाजाचे अहित करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही, असे मायावती यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
मौर्य यांनी २२ जून रोजी मायावती यांच्यावर तिकिटांचा लिलाव करण्याचा आरोप करून बसपाचा राजीनामा दिला होता. यामुळे बसपा विधिमंडळ पक्षाचे नेतेपदही रिक्त झाले आहे.
दिनकर नवे नेते
दरम्यान, मायावती यांच्या अध्यक्षतेत बसपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दलित नेते गया चरण दिनकर यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28793

Posted by on Jun 26 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (180 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२५ जून] - भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीपाठोपाठ आता राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच एनआयटीनेही आपल्या शुल्कात मोठी वाढ ...

×