Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त

यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त

=स्कायमेटचा अंदाज=
India-monsoon-rain-4नवी दिल्ली, [२४ मे] – संपूर्ण देश भीषण दुष्काळाने त्रस्त झाला असताना यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिरा होणार असल्याचे भाकीत भारतीय वेधशाळेने केल्यानंतर स्कायमेट या खाजगी हवामानविषयक संस्थेेने आज मंगळवारी आपला अंदाज जाहीर करताना, यावर्षी देशभरातच मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसणार असल्याचे स्पष्ट केले.
यावर्षी देशाच्या सर्वच भागांमध्ये सरासरीच्या १०९ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. विशेषत: मध्य भारत आणि पश्‍चिम किनारपट्टीच्या भागांमध्ये वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी राहणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या काही भागात अतीवृष्टी होण्याचा इशाराही या खाजगी संस्थेने दिला आहे.
देशभरात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात कोसळणार्‍या पावसाचे सरासरी प्रमाण ८८७ मिमी इतके असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.
स्कायमेटच्या मते, जून महिन्यात सरासरी ८७ टक्के, जुलै महिन्यात सरासरी १०८ टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरी ११३ टक्के आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी १२३ टक्के पाऊस पडणार आहे.
जून ते सप्टेंबर या काळात तामिळनाडू, ईशान्येकडील राज्ये आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात अतिवृष्टीची शक्यता फार जास्त आहे. तथापि, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या पूर्वेकडील भागात मात्र काही प्रमाणात कमी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. मान्सून केरळात पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतर अल् निनोचा प्रभाव जवळजवळ संपुष्टात येणार असून, मान्सूनच्या त्यानंतरच्या प्रगतीत त्याचा कुठलाही अडथळा राहणार नाही, असेही या संस्थेने म्हटले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28496

Posted by on May 25 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (266 of 2450 articles)


=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समिती= मुंबई, [२४ मे] - मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ...

×