युती न होण्यास भाजपा जबाबदार : जयललिता
Monday, April 4th, 2016चेन्नई, [३ एप्रिल] – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरिता माझ्या पक्षाने भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपानेच त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आता हा पक्ष निराश झाला असल्यानेच माझ्यावर निराधार आरोप करीत आहे, अशा शब्दात अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांनी हल्ला चढविला.
निवडणुका जवळ आल्या असताना युती होऊ शकली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोईम्बतूर येथील सभेच्या काळात माझ्या सरकारवर टीका केली नव्हती. माझे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे, असा विश्वास त्यांना व्यक्त केला आहे. पण, आता भाजपाचे काही वरिष्ठ नेते व मंत्री माझ्या सरकारवर आरोप करीत आहेत. त्यांची निराशाच यातून दिसून येते, असे जयललिता यांनी स्पष्ट केले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=27682

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!