Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » रघुराम राजन मनाने भारतीय नाहीत

रघुराम राजन मनाने भारतीय नाहीत

=डॉ. स्वामींचा आणखी एक बॉम्बगोळा=
Subramanian Swamy5नवी दिल्ली, [१७ मे] – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मनाने पूर्णतः भारतीय नसून त्यांनी जाणूनबुजून अर्थव्यवस्थेला उद्‌ध्वस्त केले आहे, असा आणखी एक बॉम्बगोळा भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टाकला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राजन यांना त्वरित हटवण्याची मागणी डॉ. स्वामी यांनी केली आहे. मागच्या आठवड्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर डॉ. स्वामी यांनी राजन यांच्यावर आरोप केला होता. आताही त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी या प्रकारची मागणी यासाठी करीत आहे. कारण, राजन भारतीय अर्थव्यवस्थेला जाणूनबुजून उद्‌ध्वस्त करीत आहेत, ज्यामुळे मी अवाक झालेलो आहे.
महागाईला नियंत्रित करण्यासाठी व्याज दर वाढवण्याचे धोरण विनाशकारी आहे. याचबरोबर मागील दोन वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वसूल करता न येणार्‍या कर्जाची रक्कम दुप्पट होऊन ३.५ लाख झाली असल्याचा उल्लेखही डॉ. स्वामी यांनी या पत्रात केला आहे. राजन यांना पुन्हा संधी देण्यात येऊ नये, अशी मागणीही स्वामी यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28292

Posted by on May 17 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (334 of 2453 articles)


वाराणसी, [१७ मे] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. ...

×