richwood
richwood
richwood
Home » उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय » रशियन हेलिकॉप्टर्स निर्मितीत भारतही सहभागी

रशियन हेलिकॉप्टर्स निर्मितीत भारतही सहभागी

=‘मेक इन इंडिया’चे मोठे यश=
India and Russia to jointly manufacture Kamov 226 helicopter under 'Make In India'नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला आणखी एक मोठे यश प्राप्त झाले आहे. रशियन कामोव्ह हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाच्या कामोव्ह कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला आहे.
एचएएल आणि कामोव्ह या दोन्ही कंपन्या या करारांतर्गत सुमारे २०० ‘कामोव्ह २२६-टी’ या हलक्या हेलिकॉप्टर्सची निर्मिती करणार आहेत. चिता आणि चेतक या अतिशय जुनाट हेलिकॉप्टर्सची जागा कामोव्ह हेलिकॉप्टर्स घेणार आहेत. यासाठी सुमारे एक अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रोश्टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्गेई चेमझोव्ह यांनी दिली.
विशेष म्हणजे, या सर्व हेलिकॉप्टर्सची संयुक्त निर्मिती भारतातच होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेला हा पहिला भारत-रशियातील उच्चस्तरीय उपक्रम आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच रशियाला भेट दिली होती. त्यावेळी हेलिकॉप्टर्स निर्मितीत सहकार्य करण्याच्या करारावर दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हेलिकॉप्टर्सची देखभाल आणि डागडुजीचाही या करारात समावेश आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26325

Posted by on 10:55 pm. Filed under उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google