richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » रशियाकडून पाणबुडीद्वारे सिरियावर हल्ला

रशियाकडून पाणबुडीद्वारे सिरियावर हल्ला

Russia- Submarine Fired Missile Tested to Target ISIS in Syria from Caspian Seaमॉस्को, [१० डिसेंबर] – इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खात्म्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. रशियाने सिरियातील अतिरेक्यांवर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्रे डागली आहेत. या तीन दिवसांत रशियाने जवळपास ३०० ठिकाणांवर निशाणा साधला आहे.
रशिया ३० सप्टेंबरपासून सिरियामध्ये हवाई हल्ले करत आहे. रशियन पाणबुडी रोस्तोव ऑन दोन भूमध्य सागरातून सिरियातील दहशतवादी तळांवर कॅलिबर क्रूझ क्षेपणास्त्रे डागत आहे. एका अमेरिकी अधिकार्‍याने सांगितले की, कॅस्पियन समुद्रातील लष्करी तळावरून सिरियात १० क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. जमीन, हवाई आणि सागरी क्षेत्रात सतत हल्ले करण्यात येत आहे. हल्ला करताना पाणबुडी पाण्याच्या आतमध्ये होती. या हल्ल्यात इसिसची रणनीतीची ठिकाणे, शस्त्र भंडार आणि तेल भांडार नष्ट करण्यात आले आहेत. बॉम्बवर्षाव करणार्‍या टी – २२ विमानांनी तीन दिवसांत ६० उड्‌डाणे केली आहेत.
राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन म्हणाले, पाणबुडीत अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. मात्र त्याची गरज न पडलेलीच चांगली. दरम्यान, पाणबुडी हल्ला करण्यापूर्वी अमेरिका आणि इस्त्रायलला माहिती देण्यात आली होती, असे रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांनी सांगितले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26087

Posted by on 2:59 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google