richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » रशियाचा इसिसच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला

रशियाचा इसिसच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला

=२४०० किमी अंतरावरून सोडले, पाणबुडीवरून प्रथमच हल्ला=
4 Russian warships launch 26 missiles on isisमॉस्को, [९ डिसेंबर] – इराक व सीरियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केेलेल्या इसिस या अत्यंत धोकादायक दहशतवादी संघटनेच्या सीरियातील ठिकाणांवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला असून, इसिसवर अणुहल्ला करण्याची वेळ येणार नाही, अशी आशा असल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीत पुतीन यांनी म्हटले आहे.
रशियाने बुधवारी कॅस्पियन समुद्रात तैनात असलेल्या आपल्या पाणबुडीवरून इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला केला. हे कॅलिबर क्षेपणास्त्र २४०० किमी दुरून ‘रोस्तोवॉन डॉन’ या पाणबुडीवरून सोडण्यात आले. सीरियाच्या रक्का शहरातील इसिसच्या दोन ठिकाणांना लक्ष्य करून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या हल्ल्यात इसिसचे अनेक अड्डे, शस्त्रास्त्र आणि तेल टँकर नष्ट झाले, अशी माहिती रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी दिली. रशियाने पाणबुडीवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यापूर्वी इस्रायल आणि अमेरिकेला त्याची पूर्वकल्पना दिली होती. रशियन वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी याआधी सीरियात ३०० पेक्षा जास्त हवाई हल्ले केले.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी इसिसवर अणुहल्ला करण्याची वेळ येणार नाही, अशी आशा असल्याचे म्हटले आहे. युद्धभूमीत होत असलेल्या सर्व गोष्टींचे बारकाईने विश्‍लेषण करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कशी शस्त्रे आहेत आणि ती कशी संचालित केली जात आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इसिसविरोधात युद्ध करत असताना क्षेपणास्त्रांना अण्वस्त्र जोडावे लागणार नाही हीच अपेक्षा, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26057

Posted by on 7:28 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google