Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राजकारणापेक्षा कुटुंब घडवणे कठीण : स्मृती

राजकारणापेक्षा कुटुंब घडवणे कठीण : स्मृती

Union HRD Minister Smriti Irani during a press conference in New Delhi on Sept 11, 2014. (Photo: IANS)नवी दिल्ली, [२१ मे] – राजकारणात करीअर घडविण्यापेक्षाही कुटुंब घडविण्याचे काम कित्येक पटींनी अधिक कठीण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज शनिवारी येथे केले.
वुमेन्स इकॉनॉमिक्स फोरमतर्फे आयोजित समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. राजकारणाविषयी महिलांना उगाचच भीती दाखविण्यात आली आहे. वरवर दिसते तितके राजकारणाचे क्षेत्र कठीण वा वाईट नाही, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर एखाद्या कॉर्पोरेट वा सामाजिक क्षेत्रातला अनुभव असेल तर राजकारणात करीअर घडवणे नक्कीच फारसे कठीण नसल्याचे त्या म्हणाल्या. कॉर्पोरेट क्षेत्रातही महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांना प्रचंड झुंजावे लागते. तसेच चित्र राजकारणातही आहे. मी कधीच कोणाला आदर्श मानले नाही. परंतु, पुरुषांनी मला स्मृती इराणी सारखे व्हायचे आहे, असे म्हणावे हे माझे स्वप्न होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. महिला जास्त महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांच्यात अधिक आत्मविश्‍वास असतो, असे आपले निरीक्षण असल्याचेही त्या म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28379

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (303 of 2453 articles)


=राजनाथसिंह यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [२१ मे] - इसिसची धमकी आम्ही दुर्लक्षित करणार नाही. पण, राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्या ...

×