Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटर उभारणार

राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेंटर उभारणार

=आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची माहिती=
Deepak Sawantनागपूर, [११ डिसेंबर] – मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवे डायलिसिस सेंटर उभारण्यात येतील, असे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य सुनील प्रभू यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना, आरोग्य मंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, एकूण १७ प्रवर्गातील नागरिकांना डायलिसिस सेवा मोफत देण्यात येते. मूत्रपिंडाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किडनी प्रत्यारोपणाबाबत नवीन कायदा तयार करण्याचा शासन विचार करीत आहे. तसेच डायलिसिस सेंटरसाठी नियमावली तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील २१ जिल्हा रुग्णालये, २ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये, ४ सामान्य रुग्णालये, ३ उप जिल्हा रुग्णालये अशा एकूण ३१ रुग्णालयांच्या ठिकाणी डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या ९७१ उपचार पद्धतींमध्ये योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी पद्धती अंतर्भूत आहे. या उपचार पद्धतीसाठी रुग्णालयात प्रतिमहिना ८ ते १२ डायलेसिस उपचार देण्यात येतात. यानुसार एका डायलेसिसकरिता साधारणत: रुग्णालयाच्या श्रेणीनुसार सरासरी एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत खर्च येतो. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत राज्यात २४५ डायलेसिस केंद्रे अंगीकृत आहेत. आतापर्यंत २ जुलै ते ७ डिसेंबर २०१५ या कालावधीत रुग्णालयांमार्फत १८,१५८ रुग्णांवर ९२,६९४ डायलेसिस प्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
डायलेसिस सुविधा पुरविण्यासाठी एकूण १३६ डायलेसिस यंत्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक डायलेसिस केंद्र कार्यान्वित करण्यासाठी शासनातर्फे कंत्राटी तत्त्वावर नेफ्रोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी डायलेसिस तंत्रज्ञ व अधिपरिचारिका यांची नियुक्ती केली आहे. नेफ्रोलॉजिस्ट तंत्रज्ञाची कमतरता भासत आहे. यासाठी नेफ्रोटेक्निशियनचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26141

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1028 of 2451 articles)


=पंजाबमधील सत्तेवर डोळा= नवी दिल्ली, [११ डिसेंबर] - पंजाब विधानसभेसाठी २०१७ मध्ये होणार्‍या निवडणुकीवर डोळा ठेवून, दिल्लीप्रमाणेच पंजाबही काबिज करण्याच्या ...

×