Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्य सरकारची साठेबाजांविरोधात कडक भूमिका

राज्य सरकारची साठेबाजांविरोधात कडक भूमिका

=जप्त तूर डाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव होणार=
FOOD GRAIN price hike1मुंबई, [२० नोव्हेंबर] – राज्यात गेल्या काही दिवसांत जप्त करण्यात आलेली तूर आणि तूर डाळीचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. शासनाने जप्त केलेला हा साठा जवळपास १३ हजार टन इतका असून, या निर्णयामुळे बाजारातील डाळीचे भाव आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच साठेबाजी करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात शासनाने कडक भूमिका घेतली आहे.
राज्यात डाळीचे भाव वाढल्यानंतर सरकारने तातडीने दखल घेत ठिकठिकाणी धाडी घालून डाळीचे साठे जप्त केले होते. केंद्र शासनाच्या २८ सप्टेंबर आणि १९ ऑक्टोबर २०१५ च्या अधिसुचनेनुसार तसेच जीवनावश्यक वस्तुंचा अधिनियम १९५५ मधील तरतुदींनुसार डाळी-कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. हे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्यात यावेत, अशी मागणी इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनतर्फे नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्याकडे केली होती. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन न करणार्‍या व्यापार्‍यांचा साठा तातडीने मुक्त करण्यात येत आहे. मात्र, साठा मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांचा माल शासनाच्या ताब्यात आहे.
जप्त करण्यात आलेल्या डाळीच्या साठ्यापैकी फक्त तूर आणि तूरडाळीच्या साठ्याची विक्री करण्यासाठी संबंधित व्यापार्‍यांकडून क्षतिपूर्ति बॉण्ड घेऊन हा साठा परत करण्याची सूचना शासनाने ५ नोव्हेंबरच्या आदेशानुसार केली होती. मात्र, व्यापार्‍यांच्या संघटनेने त्यास असमर्थता दर्शवून हा साठा वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याची मागणी केली होती. ती सरकारने फेटाळली असून, जप्त केलेली तूर आणि तूर डाळीचा याबाबतच्या कायद्यातील तरतुदीनुसार खुला जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25625

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1188 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग हे दोन महिन्यांच्या पितृत्व रजेवर जाणार आहेत. त्यांची पत्नी ...

×