Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा

राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा

=प्रवीण तोगडिया यांचे आवाहन=
PRAVEEN_TOGADIAअहमदाबाद, [२४ नोव्हेंबर] – रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि जगभरात हिंदूंना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे विश्‍व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करणारा कायदा तयार करावा, असे आवाहन विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले.
अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आयोजित सभेत तोगडिया बोलत होते. अयोध्येत राम मंदिराची उभारणी हीच अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सोमनाथ मंदिर उभारण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्याप्रकारे लोकांशी चर्चा न करता आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा न बघता संसदेत ठराव आणला होता, त्याचप्रकारे अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठीही केंद्र सरकारने असाच ठराव संसदेत मंजूर करावा, अशी आमची मागणी असल्याचेही तोगडिया म्हणाले. यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि राज्यपाल ओ. पी. कोहली हे देखील उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25701

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1163 of 2453 articles)


=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [२४ नोव्हेंबर] - राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र कोष’ स्थापन करण्यास राज्य ...

×