Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींच्या समोर मोदी! मोदी!चे नारे

राहुल गांधींच्या समोर मोदी! मोदी!चे नारे

=विजेंदरच्या लढतीच्यावेळी घडला प्रकार=
rahul-gandhiनवी दिल्ली, [१७ जुलै] – भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह आणि ऑस्ट्रेलियाचा केरी होप यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट अजिंक्यपद जेतेपदाच्या लढतीकडे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असताना या लढतीसाठी उपस्थित असलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोर प्रेक्षकांनी मोदी… मोदी… असे नारेबाजी केली.
टी-शर्ट आणि जीन्स घालून राहुल गांधी यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच उपस्थितांपैकी काहींनी त्यांची खिल्ली उडवली आणि नंतर मोदी… मोदीच्या घोषाने स्टेडियम दुमदुमून गेले. ४६ वर्षीय राहुल गांधी यांनी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या बाजूला बसून विजेंदरच्या लढतीचा आनंद लुटला.
लढत संपल्यानंतर बाहेर पडतानाही राहुल गांधी यांना अशाच स्थितीचा सामना करावा लागला. परंतु, प्रेक्षकांकडून खिल्ली उडविली जात असताना राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि हसत हसत स्टेडियममधून बाहेर पडले.
विजेंदरच्या या लढतीसाठी क्रिकेट, बॉलीवूड, राजकारण आणि इतर काही क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29137

Posted by on Jul 18 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (142 of 2453 articles)


=मंच कोसळल्याने शीला दीक्षित, राज बब्बर किरकोळ जखमी= लखनौ, [१७ जुलै] - पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने ...

×