Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी करणार आप, भाजपाविरोधात आंदोलन

राहुल गांधी करणार आप, भाजपाविरोधात आंदोलन

Rahul-Gandhi3नवी दिल्ली, [२४ मे] – राजधानी दिल्लीतील वीज कपात आणि पाण्याचा तुटवडा या मुद्यांवरून केजरीवाल सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २८ मे रोजी राजघाट येथून मोर्चा काढण्यात येणार असून, तो केजरीवाल सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या सचिवालयावर नेण्यात येणार आहे. वीज आणि पाण्याच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चातील प्रत्येकांच्या हातात मशाल देण्यात येणार आहेत, अशी माहिती दिल्ली कॉंगे्रसचे प्रमुख अजय माकन यांनी पत्रकारांना दिली.
आप आणि भाजपातील वाढत्या मतभेदांमुळेच दिल्लीत वीज आणि पाण्याची समस्या निर्माण झाली असून, मुख्यमंत्री केजरीवाल यांना केंद्र सरकारसोबत संघर्षाची भूमिका घेण्याची सवयच झाली आहे, असा आरोपही माकन यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28480

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (273 of 2453 articles)


=प्रथमच महिला जवानांची तुकडी तैनात= नवी दिल्ली, [२४ मे] - विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी काम करणार्‍या महिला ...

×