richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राहुल गांधी ५७ दिवस कुठे होते?

राहुल गांधी ५७ दिवस कुठे होते?

=व्ही. के. सिंह यांचा पलटवार=
VK-Singh_4नवी दिल्ली, [३ डिसेंबर] – दलित हत्याकांडाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या मुद्यावरून संसदेत बोलताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधी ५७ दिवस कुठे होते आणि संसदेत ते किती वेळ उपस्थित असतात, असा सवाल केला आहे.
राहुल गांधी यांनी असहिष्णुतेच्या मुद्यावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान व्ही. के. सिंह यांच्या अनुपस्थितीवर टीका केली होती. त्याला व्ही. के. सिंह यांनी ट्विटस्‌च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. राहुल गांधी संसदेतील माझ्या अनुपस्थितीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. मग याच वर्षी तब्बल ५७ दिवस ते कुठे गायब होते, असा सवाल करतानाच, २०१३ मध्ये संसदेत त्यांची उपस्थिती फक्त ४३ टक्के होती, याकडे व्ही. के. सिंह यांनी लक्ष वेधले.
कामाप्रती असलेली कटिबद्धता आणि देशावर असलेले प्रेम व आदर लक्षात घेता राहुल गांधी यांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. विभाजनकारी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर केला. परंतु, मी तब्बल ४२ वर्षे या महान देशाच्या लष्करात सेवा केली, याचा त्यांना विसर पडला. या देशातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक एकोपा कायम ठेवण्यासाठी मी व माझ्या सैनिकांनी प्राणांची बाजी लावली याचाही त्यांना विसर पडला, असे जनरल व्ही. के. सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25958

Posted by on 11:13 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google