richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे प्रवाशाने मानले प्रभूंचे आभार

रेल्वे प्रवाशाने मानले प्रभूंचे आभार

suresh-prabhuनवी दिल्ली, [३० नोव्हेंबर] – केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयाच्या ट्वीटरवर केलेल्या मेसेजने पुन्हा एकदा एका मुलाला आपल्या वडिलांना वेळीच उपचार करण्यास मदत झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच रेल्वेच्या डब्यात सहप्रवाशाकडून असुरक्षित वाटणार्‍या एका महिलेने ट्वीटरवर मेसेज टाकून मदत मागितली आणि प्रभूंच्या कृपेने तिला तत्काळ मदत मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा एका प्रवाशाला तत्काळ मदतीचा अनुभव आल्याने तो प्रवासी सुखावला आहे.
ही दुसरी घटना कर्नाटकातील यशवंतपूर ते बिकानेर असा प्रवास करणार्‍या पंकज जैन याच्याबाबत घडली आहे. प्रवासात असताना पंकजच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्याने रेल्वे मंत्र्यालयाच्या ट्वीटर अकाऊंटवर त्याने मेसेज टाकला आणि तत्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली. टाकलेल्या मेसेजद्वारे पंकज जैननी वडिलांच्या काळजीपोटी रेल्वे पाच मिनिटासाठी थांबवून व्हिलचेअरची मागणी केली आणि खरच त्याच्या मदतीसाठी पुढच्या मेडता रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचारी व्हिलचेअर घेऊन हजर होते.
कर्नाटकातील जनता दल सेक्यूलरच्या युवा विभागाचे उपाध्यक्ष आणि उद्योजक असलेल्या पंकज जैन यानी ट्वीटरवर सांगितले की, वडिलांना उपचारासाठी बुटाटीधाम रुग्णालयात दाखल केले असून रेल्वेच्या या तत्पर सेवेबद्दल त्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंसह मंत्रालय आणि कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25894

Posted by on 2:35 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google