richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी

रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी

=सर्वपक्षीय सदस्यांनी लोकसभेत केले अभिनंदन=
nitin gadkari1नवी दिल्ली, [११ ऑगस्ट] – रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आणि जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्रात नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे आज सर्वपक्षीय सदस्यांनी लोकसभेत स्वागत केले. भाजपाच्या एका सदस्याने तर गडकरी यांचा उल्लेख रोडकरी असा केला, त्यावर गडकरी आता पोर्टकरीही होतील, असे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी म्हटले.
लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात भाजपाचे प्रल्हाद पटेल यांनी आपला प्रश्‍न विचारतांना गडकरी यांनी रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गाबाबत केलेल्या कामांची प्रशंसा करत गडकरी आता रोडकरी झाले असल्याचे सांगितले. भाजपाच्या महाराष्ट्रातील सदस्यांनी प्रल्हाद पटेल यांच्या टिपण्णीचे समर्थन केले. पटेल यांचा रोडकरी हा शब्द पकडत सभापती सुमित्रा महाजन यांनी गडकरी आता पोर्टकरीही होतील, असे गौरवोद्‌गार काढले.
बंदराबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर गडकरी उत्तर देत होते. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून सरकारी बंदरांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. खाजगी बंदराच्या तुलनेत सरकारी बंदरे नफ्यात चालत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांनी रस्ते आणि पुलाच्या क्षेत्रात केलेल्या कामांमुळे त्यांचा उल्लेख तेव्हा रोडकरी, पुलकरी असा केला जात होता. आता राष्ट्रीय स्तरावरही गडकरी यांचा उल्लेख रोडकरी, पोर्टकरी असा झाला आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=29193

Posted by on 3:45 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

1 Comment for “रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी”

  1. विश्वनाथ रा सुतार.

    देशाच्या वेगवान आर्थिक प्रगतीसाठी चांगले व सुरक्षित रस्ते तसेच आधुनिक सुविधायुक्त पोर्टची अत्यंत आवश्यकता असते.आपल्या अंगभूत कल्पकतेने व हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी त्यात पूर्णपणे स्वत:ला वाहून घेण्याच्या गुणामुळे गडकरींनी या क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणली आहे,हे मात्र कोणाला विसरता येणार नाही.

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google