richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » लता मंगेशकर पुरस्कार वितरण ३ डिसेंबर रोजी

लता मंगेशकर पुरस्कार वितरण ३ डिसेंबर रोजी

lata mangeshkarमुंबई, [३० नोव्हेंबर] – ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना २०१५ या वर्षाचा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात गुरुवार, ३ डिसेंबरला होणार आहे.
पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वर आले जुळूनी हा लोकप्रिय गाण्याचा कार्यक्रम विभावरी आपटे-जोशी, सावनी दातार-कुलकर्णी, अमेय जोग, राजेश दातार, प्रसाद जोशी, अमृता दिवेकर, अजय अत्रे, राधिका अंतुरकर, नीलेश देशपांडे, केदार मोरे, मंगेश वाघमारे आदी कलावंत सादर करणार आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25885

Posted by on 2:21 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google