Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » लालूच चालविणार राज्यकारभार?

लालूच चालविणार राज्यकारभार?

=नितीशकुमारांचे मुख्यमंत्रिपद नाममात्र=
lalu-yadav-nitish-kumarनवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] – बिहारमध्ये महाआघाडी दोन तृतियांश बहुमताने सत्तेवर आली आणि नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहाणार असले तरी त्यांचे हे पद नाममात्रच राहाणार आहे. कारण, सर्वाधिक ८० जागांवर कब्जा करणारे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मर्जीनुसार अर्थात आदेशानुसार नितीशकुमारांना बिहारचा राज्यकारभार चालवावा लागणार आहे, अशी चर्चा केवळ बिहारच्याच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातही रंगली आहे.
बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लालू-नितीश यांच्यात गळाभेट झाली. त्याचवेळी लालूंनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले होते. पण, राज्यकारभाराची किल्ली मात्र लालू स्वत:च्याच हातात ठेवणार आहेत. भाजपासोबतच्या सत्ताकाळात नितीशकुमारांना विकासाच्या योजना राबविण्याचे जेवढे स्वातंत्र्य होते, ते त्यांना लालूंसोबतच्या सत्ताकाळात मिळणार नाही. किंबहुना लालू त्यांना हे स्वातंत्र्य देणारच नाहीत, असे आता जाहीरपणे बोलले जात आहे.
बिहार निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआचा पराभव झाल्याचा आनंद नितीशकुमारांच्या चेहर्‍यावर दिसत असला, तरी जदयुपेक्षा राजदला जास्त जागा मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर चिंता जास्त दिसत होती. लालूंच्या पक्षाला जास्त जागा मिळण्याचा अर्थ त्यांना चांगलाच कळून चुकला होता. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याला विरोध करून नितीशकुमार यांना बिहारमध्ये रालोआतून बाहेर पडणे शक्य झाले होते. कारण, त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:चे ११५ सदस्यांचे पाठबळ होते. आता चित्र वेगळे आहे. लालूंची हुकूमशाही मान्य न झाल्यास त्यांना महाआघाडीतून बाहेर पडणे शक्य होणार नाही. कारण, आता त्यांच्याकडे केवळ ७२ सदस्यांचेच पाठबळ आहे आणि २६ सदस्य असलेल्या कॉंगे्रसला सोबत घेऊनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे लालूंचा आदेश निमूटपणे मान्य करणे आणि पाच वर्षे आपली खुर्ची सांभाळणे एवढाच पर्याय त्यांच्याजवळ आहे.
सूत्रांच्या मते, नितीशकुमार यांनी जर लालूंचा आदेश ऐकण्यास नकार दिला, तर लालूप्रसाद त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदही काढून घेतील, अशीही शक्यता आहे. अशा स्थितीत नितीशकुमार हे लालूंचे किती लाड पूर्ण करू शकतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25420

Posted by on Nov 14 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1248 of 2452 articles)


=जागतिक व्यापार मेळा= नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] - उद्या शनिवारपासून राजधानीतील प्रगती मैदानावर सुरु होणार्‍या जागतिक व्यापार मेळ्यात महाराष्ट्राचे दालनही ...

×