Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » लोकपालचा मसुदा तयार

लोकपालचा मसुदा तयार

=१० डिसेंबरपर्यंत राज्यसभेला सादर करणार=
sansad4नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – तब्बल एक वर्ष वादळी चर्चा केल्यानंतर लोकपालवरील संसदीय समितीने भ्रष्टाचारविरोधी लढा देणार्‍या लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार केला असून, १० डिसेंबरपूर्वी तो राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे.
कॉंगे्रसचे खासदार ई. एम. सुदर्शन नचीप्पन यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय समितीने लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर अभ्यास केला. एक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू होती. आता ती पूर्ण झाली असून, लोकपालचा मसुदा तयार झालेला आहे. समितीतील सर्व सदस्यांना त्याच्या प्रती विचारार्थ पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून आलेल्या सूचना त्यात समाविष्ट केल्या जातील आणि नंतर तो राज्यसभेला सोपविला जाईल, अशी माहिती नचीप्पन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
लोकपाल कसे असावे, यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबतच समाजातील विविध घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सर्वांचे मत व सूचना विचारात घेऊनच विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. विविध तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, पूर्वीच्या संपुआ सरकारने तयार केलेल्या लोकपाल विधेयकात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्यानंतर भाजपाप्रणीत रालोआ सरकारने ते गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केले होते. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी ते पुढील अभ्यास करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीकडे सोपविण्यात आले. यावर्षीच्या २५ मार्चपर्यंत समितीला आपला अहवाल सादर करायचा होता. पण, या काळात समितील तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25843

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1122 of 2453 articles)


=बान की मून यांची भूमिका= संयुक्त राष्ट्रसंघ, [२९ नोव्हेंबर] - भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत झाल्यास केवळ या दोन देशांमध्येच ...

×