Home » क्रीडा, ठळक बातम्या » वन-डेत महत्त्वपूर्ण बदल

वन-डेत महत्त्वपूर्ण बदल

=नवीन नियमांना आयसीसीची मान्यता=
Rudi-Koertzen-umpireबार्बाडोस, [२७ जून] – आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुमार गोलंदाजांचे हितजोपाचताना आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या खेळांच्या नियमांत काही आमुलाग्र बदल करण्यात आले. शिफारस समितीने सुचविण्यात आलेले बदल आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारले आहेत.
आयसीसीच्या आज येथे पार पडलेल्या या बैठकीत खेळाच्या नियमांत जे बदल करण्यात आले ते येत्या ५ जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या बैठकीत त्या निर्णयावर शिक्कामार्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता गोलंदाजांना त्याचा नक्कीच फायदा होईल. या नव्या बदलेल्या नियमांमुळे पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चुरस बघावयास मिळणार आहे.
सामन्याच्या नियमांमधील काही महत्त्वाचे बदल असे-
१) पहिल्या १० षटकांमध्ये आता झेल घेण्याच्या जागेवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.
२) १५ ते ४० षटकांमध्ये बॅटिंग पॉवरप्ले नाही.
३) ४१ ते ५० षटकांदरम्यान आता ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर आता चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा.
४) कोणत्याही नो-बॉलवर आता प्रतिस्पर्धी फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.
११ वर्षांनंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये
भारतीय पंचाला स्थान
भारताचे पंच सुंदरम रवी यांचा आयसीसीने २०१५-१६ या वर्षासाठी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. २००४ नंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळविणारे सुंदरम रवी हे पहिलेच भारतीय पंच ठरले आहेत. या अगोदर २००४ मध्ये एस. वेंकटराघवन हे आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये होते.
आयसीसीने नुकतीच एलिट पॅनेलची यादी जाहीर केली होती. यामध्ये सुंदरम रवी आणि ख्रिस गाफनी यांना बिली बौडन आणि स्टिव डेविस यांच्या जागी स्थान देण्यात आले आहे. घोषित करण्यात आलेल्या एलिट पॅनेलमध्ये अलीम दार, कुमार धर्मसेना, एन. इरॅसमस, इयान ग्लाऊड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलब्रो, नायजेल लॉंन्ग, पॉल रफेल, रॉड टकर आणि ब्रूस ऑक्सेनफोर्ड यांचाही समावेश आहे.
सुंदरम रवी यांनी २०११ मध्ये पहिल्यांदा विशाखापट्टनम येथे भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यात पंचगिरी केली होती. रवी यांनी आतापर्यंत ६ कसोटी, २४ एकदिवसीय आणि १२ टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23122

Posted by on Jun 28 2015. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (1598 of 2455 articles)


मुख्यमंत्र्यांकडून एमईआरसीच्या निर्णयाचे स्वागत ऊर्जामंत्री, वीज अधिकार्‍यांचे अभिनंदन दर आणखी कमी करण्याचे आश्‍वासन मुंबई, [२७ जून] - महाराष्ट्र राज्य ...

×