Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » वर्षभरात इस्रो प्रक्षेपित करणार २५ उपग्रह!

वर्षभरात इस्रो प्रक्षेपित करणार २५ उपग्रह!

isro logoनवी दिल्ली, [११ मार्च] – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येत्या वर्षभरात सात देशांचे २५ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये सर्वाधिक उपग्रह अमेरिकेचे आहेत. पंतप्रधान कार्यालयाील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती आज शुक्रवारी राज्यसभेत दिली.
पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल अर्थात पीएसएलव्हीच्या माध्यमातून आतापर्यंत २१ देशांच्या ५७ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोची वाणिज्यविषयक शाखा ऍन्ट्रिक्सने २०१६-१७ या वर्षात अल्जेरिया आणि कॅनडातून प्रत्येकी तीन, जर्मनीतून चार, जपान आणि मलेशियाच्या प्रत्येकी एक आणि अमेरिकेच्या १२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. याशिवाय, सरकारने २३ नव्या परियोजनांच्या माध्यमातून ४६ नवे रिऍक्टर्स स्थापन करण्यास सैद्धांतीक मंजुरी दिली आहे. त्यामध्ये गोरखपूर अणू विद्युत परियोजना आणि कुडानकुलम परमाणु विद्युत योजनेला प्रशासनिक आणि वित्तीय मदतीला मंजुरी देण्याचाही समावेश असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिशादर्शक प्रणालीतील सात उपग्रहांपैकी सहावा उपग्रह याच आठवड्यात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला असून, सातवा सर्वाधिक मोठा आणि अंतिम उपग्रह या वर्षाअखेरीस प्रक्षेपित केला जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27233

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (693 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ मार्च] - आधार विधेयकामुळे नागरिकांची गोपनीय माहिती सार्वजनिक होण्याची तसेच त्याचा दुरुपयोग होण्याची आशंका फेटाळून लावत कल्याणकारी ...

×