Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वर्षभरासाठी नीट लांबणार

वर्षभरासाठी नीट लांबणार

=केंद्र सरकार जारी करणार अध्यादेश=
neet- medical enterence examनवी दिल्ली, [१८ मे] – एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, यावर्षासाठी राज्य सरकारांनी घेतलेल्या सीईटीनुसारच प्रवेश देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. असा अध्यादेश येत्या काही दिवसांतच जारी करण्यात येणार आहे.
यावर्षी राज्यांच्या सीईटीनुसारच वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या मुद्यावर अनेक राज्यांची भूमिका केंद्राने ऐकून घेत ती मान्यही केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिली. तथापि, ज्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ते ‘नीट’ देऊ शकणार आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गेल्याच आठवड्यात १४ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन या वर्षासाठी सीईटीला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. सोबतच, सर्वोच्च न्यायालयाची मनवळवणी करण्यासाठीही राज्यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती.
न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले असून, त्यांचे भवितव्यही पणाला लागले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने पावले उचलावी. तसेच आवश्यकता भासल्यास अध्यादेश जारी करावा, अशी मागणीही राज्यांनी केली होती.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ मे रोजी घेण्यात आलेल्या नीटच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६.५ लाख विद्यार्थी बसले होते. २४ जुलै रोजी नीटचा दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ‘नीट’ हाच एकमेव पर्याय असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28307

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (328 of 2453 articles)


पुणे, [१८ मे] - रखरखत्या उन्हाने शरीराची लाहीलाही झाल्यानंतर प्रत्येकच जण ज्याची चातकासारखी प्रतीक्षा करीत होते, त्या नैऋत्य मान्सूनचे आज ...

×