richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न

विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न

=अरुण जेटली यांचा आरोप, सदोष जीएसटीपेक्षा विलंब बरा=
arun-jaitley2नवी दिल्ली, [१९ डिसेंबर] – विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्‍या भारताच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत, असा थेट आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला असून, सदोष वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयकापेक्षा याला विलंब झालेला बरा, या शब्दात संताप व्यक्त केला आहे.
‘सदोष जीएसटी विधेयकापेक्षा त्याला विलंब झालेला बरा. कॉंग्रेस पक्ष याबाबतची आपली हटवादी भूमिका सोडेल अशी मी अपेक्षा करतो’, असे अरुण जेटली यांनी आज शनिवारी फिक्की या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. अतिशय दुय्यम कारणामुळे जीएसटीला विलंब करण्याचा प्रयत्न होत आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी जर हे करू शकत नसेल, तर दुसर्‍या कुणालाही करू देणार नाही, याच भावनेतून हा विरोध होत आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले.
जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करावे एवढी भारतीय अर्थव्यवस्था अद्याप मोठी नाही. आम्ही जागतिक विकासात मोठा हातभार लावू शकतो. परंतु, जागतिक अर्थव्यवस्था ही निश्‍चितपणे मंदावली आहे हेदेखील सत्य आहे, असे जेटली म्हणाले. सलग दोन वर्षे भारताला मान्सूनने दगा दिल्यामुळे ग्रामीण भागातील क्रयशक्तीवर विपरित परिणाम झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारनेच सादर केलेले विधेयक विरोधी पक्ष बहुमतात असलेल्या राज्यसभेत पारित करण्याचा भाजपाप्रणीत रालोआ सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, आता कॉंग्रेस पक्षच या ना त्या कारणाने जीएसटी विधेयकाला विरोध करत आहे. लोकसभेत याचवर्षी पारित झालेले हे विधेयक राज्यसभेत रखडले आहे. आपण सुचविलेल्या तीन दुरुस्त्या मान्य करेपर्यंत जीएसटीला पाठिंबा देणार नाही, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही जीएसटीवगळता उर्वरित सहा विधेयकं पारित करण्यावर एकमत झालं आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26226

Posted by on 10:13 am. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google