richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विकासासाठी राज्यांचे मजबूत खांदे आवश्यक

विकासासाठी राज्यांचे मजबूत खांदे आवश्यक

=पंतप्रधानांचे प्रतिपादन=
narendra-modi-513नवी दिल्ली, [४ डिसेंबर] – एकट्या दिल्लीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नाही, एकट्या दिल्लीच्या बळावर देश आर्थिक विकास साध्य करू शकणार नाही. त्यासाठी सर्वच राज्यांच्या मजबूत खांद्यांची आवश्यकता आहे. यासाठी देशातील सर्वच राज्यांना केंद्र सरकार विश्‍वासात घेणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले.
एकट्या दिल्लीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नाही आणि एकट्या दिल्लीच्या बळावर देशाचा विकासही होऊ शकत नाही. सर्वच राज्यांचा विकास झाला, तरच देशाची आर्थिक भरभराट होऊ शकते. यासाठी केंद्र व राज्यांनी एकत्र यायला हवे, असे मोदी यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले.
देशाच्या विकासात राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी आपल्या सरकारने केंद्रात प्रत्येक राज्याकरिता वेगवेगळे विभाग उघडले आहेत. सोबतच, अनेक ठोस पावलेही उचलली आहेत, असे विशद करताना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या विकासात राज्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्याकडून केंद्राला सहकार्याची फार जास्त अपेक्षा आहे. आपल्या राज्यांची ताकद आणि त्यांच्यातील गुणवत्तेची माहिती जगाला व्हायलाच हवी.
व्यवसाय करण्यासाठी आवश्यक मूलभूत व्यवस्थांच्या क्रमवारीत भारताचे स्थान उंचावले असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, भारतात व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रित काम करीत आहेत.
ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांची उद्योगांबाबत कधी चर्चा होत नव्हती, पण आता त्यांनी व्यवसायाच्या संधी उचावण्याच्या क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे.
संसद सुरळीत ही चांगली बातमी
मला आता संसदेत जायलाच हवे. कारण, संसदेचे कामकाज सुरू झाले आहे आणि माझ्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे. याचे श्रेय एकट्या नरेंद्र मोदी यांचे नसून, सर्वच राजकीय पक्षांच्या सहकार्याने ते शक्य झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26009

Posted by on 3:37 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google