Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » विचारधारेवरील विश्‍वासाचे प्रतीक : मोदी

विचारधारेवरील विश्‍वासाचे प्रतीक : मोदी

=निवडणूक निकाल विकासाभिमुख=
narendra-modi-namaskarनवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे भाजपाच्या विकासाभिमुख विचारधारेवर जनतेने व्यक्त केलेल्या विश्‍वासाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आसाममध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, तसेच अन्य चार राज्यांत पक्षाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर ११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी आले असता भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, भाजपाचे संघटनमंत्री रामलाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांचे भाजपा कार्यालयात आगमन झाल्यानंतर त्यांच्यावर गुलाबपाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. खास आसामी टोपी आणि गुलाब पुष्पांचा भव्य हार घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यालयात प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते. मोदी मोदी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. पाच राज्यांतील निवडणूक निकाल भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, मतदारांचा भाजपावरचा विश्‍वास वाढल्याचे हे द्योतक आहे. भाजपावर विश्‍वास टाकल्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28351

Posted by on May 19 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (313 of 2450 articles)


=अमित शाह यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [१९ मे] - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी केंद्रातील मोदी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीवर ...

×