Home » केरळ, ठळक बातम्या, राज्य » विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

=९२ वर्षांचे अच्युतानंदन रुसले=
p vijayanतिरुवनंतपुरम्, [२० मे] – माकपा पोलिट ब्युरोचे वरिष्ठ सदस्य पी. विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री राहणार आहेत. आज शुक्रवारी झालेल्या माकपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
माकपाचे मुख्यालय असलेल्या एकेजी भवनात आज ही बैठक झाली. माकपाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस प्रकाश कारत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विजयन यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर माकपा पोलिट ब्युरोच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती पक्ष सूत्राने दिली.
९३ वर्षीय व्ही. एस. अच्युतानंदन हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले विजयन हे माकपा पोलिट ब्युरोचे एकमेव सदस्य आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रसप्रणीत युडीएफला सत्तेबाहेर करणार्‍या माकपाप्रणीत एलडीएफला १४० सदस्यीय विधानसभेत ९१ जागा मिळाल्या आहेत. तर, कॉंगे्रसला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28353

Posted by on May 21 2016. Filed under केरळ, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in केरळ, ठळक बातम्या, राज्य (308 of 2449 articles)


कॉंग्रेस,डाव्यांना केरळ आणि बंगालमध्ये नारळ बंगालमध्ये दीदींवरच ‘ममता’ तामिळनाडूत अम्मांचाच करिश्मा पुद्दुचेरीत कॉंग्रेस काठावर नवी दिल्ली, [१९ मे] - ...

×